repair mahalgaon nakadongri road demands citizen rasta roko andolan at bhandara balaghat road  Saam Digital
महाराष्ट्र

महालगाव नाकाडोंगरी मार्गावर खड्डेच खड्डे, ग्रामस्थांचा रास्ता राेकाे; भंडारा- बालाघाट मार्गावरील वाहतूक ठप्प

repair mahalgaon nakadongri road demands citizen rasta roko andolan at bhandara balaghat road : अनधिकृत रेतीच्या चोरट्या वाहतुकीने नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

महालगाव- नाकडोंगरी मार्गाची तातडीने दुरूस्त करावी, ब्राम्हणटोला- बिनाखी रस्त्यावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालावी आदी मागण्यांसाठी आज (शनिवार) महालगाव फाटा येथे ग्रामस्थांनी रास्ता राेकाे आंदाेलन केले. या आंदाेलनामुळे भंडारा- बालाघाट मार्गावर तीन तास वाहतूक ठप्प झाली हाेती.

रेतीच्या जड वाहतुकीने महालगाव ते नाकाडोंगरी राज्यमार्ग जमिनीत गेला आहे. या मार्गावरून डांबर आता दिसेनासा झाले आहे. हा मार्ग खड्ड्यात गेला आहे. नागरिकांना पायदळ चालणे कठीण झाले आहे.

नाकाडोंगरी ते महालगाव मार्गाने चालायचे की मरायचे असा एकच सवाल उपस्थित होत आहे. याच मार्गाच्या दुरुस्तीसाठी भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे भंडारा- बालाघाट मार्ग तब्बल तीन तास ठप्प झाला हाेता. दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब राग लागलेली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT