संत निळोबाराय पालखी (संग्रहित) 
महाराष्ट्र

कोणाला जमलं नाही ते नीलेश लंकेंनी केलं...

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः नीलेश लंके यांची आमदार म्हणून निवड झाल्यापासून त्यांनी गावातील तसेच तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोवडले आहेत. राजकारणासह समाजकारणातही त्यांनी उजवे काम केले आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत आहे. कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांची ख्याती राज्याबाहेर गेली आहे.मात्र, गेल्या आठवड्यात त्यांचे आणि तहसीलदार ज्योती देवरे यांच्यात घमासान झाले. असे असले तरी त्यांनी समाजहिताची कामे थांबवलेली नाहीत. धार्मिक क्षेत्रातील हे मोठे पाऊल आहे.

रुईछत्रपती येथून गेल्या २५ वर्षांपासून आषाढी व कार्तिकीला पंढरपूर, आळंदी, तसेच संत निळोबाराय यांच्या पावन भूमीत जाणाऱ्या संगमेश्वर व निळोबाराय अशा दोन वेगवेगळ्या दिंड्या एकाच गावातून निघत होत्या. त्यामुळे गावातील धार्मिक वातावरणात तेढ निर्माण होत असे. त्याचा विचार करून, यापुढे दोन्ही दिंड्यांचे एकत्रीकरण करून एकच श्री संगमेश्वर निळोबा महाराज पालखी सोहळा या नावाने सुरू करण्यात येणार आहे. Religious reconciliation due to Nilesh Lanka

आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील दोन्ही दिंडीप्रमुख व ग्रामस्थांची संत निळोबाराय संस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांच्या उपस्थितीत दोन्ही दिंड्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. यापुढे गावामध्ये एकच पालखी निघणार आहे. पंढरपूर, आळंदी, तसेच पिंपळनेर या तीनही ठिकाणी संगमेश्वर निळोबा महाराज पालखी सोहळा या नावाने ती असेल, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. Religious reconciliation due to Nilesh Lanka

बैठकीस संत निळोबाराय महाराजांचे वंशज गोपाळकाका मकाशीर, विश्वस्त भाऊसाहेब लटांबळे, बंडू साबळे यांच्यासह रुई छत्रपती येथील मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती सरपंच विजया साबळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT