‘जवाद’ चक्रीवादळाबाबत 'या' ठिकाणी रेड अलर्ट जारी; मोदींच्या अधिकाऱ्यांना सुचना Saam TV
महाराष्ट्र

‘जवाद’ चक्रीवादळाबाबत 'या' ठिकाणी रेड अलर्ट जारी; मोदींच्या अधिकाऱ्यांना सुचना

राज्याने बचाव आणि मदत कार्यासाठी NDRF, ODRAF आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून आपत्ती व्यवस्थापन धोरण देखील तयार केले आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जवाद चक्रीवादळ ४ डिसेंबरला राज्यात दाखल होण्याची शक्यता असल्याने ओडिशा सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पुढील ४८ तासांत ते चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD नुसार, चक्रीवादळ 4 डिसेंबर रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या अंदाजादरम्यान ओडिशातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याने बचाव आणि मदत कार्यासाठी NDRF, ODRAF आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून आपत्ती व्यवस्थापन धोरण देखील तयार केले आहे.

आयएमडीने काही जिल्ह्यांमध्ये रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला असून, येत्या काही दिवसांत 'मुसळधार' ते 'अत्यंत मुसळधार' पावसाचा अंदाज आहे. हवामान कार्यालयाने सांगितले की, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ३ डिसेंबरच्या सुमारास चक्री वादळात तीव्र होईल. ही प्रणाली वायव्येकडे सरकून 4 डिसेंबरच्या सुमारास उत्तर आंध्र प्रदेश-ओडिशा किनारपट्टीवर पोहोचेल. IMD चे शास्त्रज्ञ उमाशंकर दास चक्रीवादळ जवादावर म्हणाले, '4 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट सुरू आहे, 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांना 3 ते 5 डिसेंबर दरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

4 डिसेंबर रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, IMD ने गजपती, गंजम, पुरी आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील चक्रीवादळ संबंधित परिस्थितीवर बैठक झाली. वादळाच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ते सर्व मार्गदर्शक तत्त्वे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात प्रदेश, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकात कमीपाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.ओडिशा, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, सौराष्ट्र, कच्छ, विदर्भ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये कमीप्रमाणात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT