Rajesh Tope  Saam Tv
महाराष्ट्र

आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार; राजेश टोपेंची माहिती

आरोग्य विभागातील परीक्षांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: काही दिवसापूर्वी आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यावर आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रीया दिली. लवकरच ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या परीक्षा संबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, लवकरच या परीक्षा होणार असल्याचे टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले.

आज जालना येथे बोलताना राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची परीक्षा लवकरच होतील असे स्पष्ट केले. आरोग्य विभागाच्या गट क, व गट ड रिक्त पदांसाठी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या रिक्त पदांसाठी त्वरित भरती प्रक्रिया राबवण्यात यावी. यासाठी आरोग्य विभागाच्या रामास्वामी यांच्याशी चर्चा झाली आहे.

याबद्दल त्यांना मी लेखी सूचनाही दिली असल्याचे टोपे म्हणाले. ज्यांनी परीक्षेसाठी अर्ज केलेले आहेत, त्यांच्याकडून पुन्हा परीक्षा फी घेतल्या जाणार नसल्याचेही टोपे यांनी सांगितले. तर ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली असेल अशा उमेदवारांनासुद्धा संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी लेखी सूचना केल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यात पुन्हा आरोग्य विभागाच्या 'क' आणि 'ड' च्या परीक्षा लवकरच घेतल्या जातील असंही टोपे (Rajesh Tope) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT