RBI Repo Rate Hike
RBI Repo Rate Hike SAAM TV
महाराष्ट्र

RBI Repo Rate: गृह, वाहन कर्जाचा EMI वाढणार; RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात केली वाढ

Ruchika Jadhav

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने आज पुन्हा एकदा रेपो दर वाढवले आहेत. रेपो दरात तब्बल २५ बेसीस पॉईंट्सने वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज बैठकीत झालेल्या निर्णयाची घोषणा केली.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरींग कमीटीची बैठक गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर आज वाढवण्यात आलेला रेपो दर आज जाहीर करण्यात आला आहे. (Latest Repo Rate News)

व्याज दर वाढवल्याने सर्वसांमान्यांच्या व्याज दरावर याचा फटका बसत आहे. २५ बेसीस पॉईंट्सने व्याजदर वाढवण्यात आल्याने आता व्याज दर एकूण ६.५० इतका वाढला आहे. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ केल्यावर कर्जाचा दर वाढतो. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाप्ते वाढतात. आता पर्यंत एकूण ५ वेळा रेपो दर वाढवण्यात आलेत. आता सहाव्यांदा दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज यांचे व्याजदर वाढल्याने मुदत ठेवींवरील व्याजदर देखील वाढतात. रेपो दर वाढल्यानंतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात रेपो दर ६.२५ इतका होता. सतत ४ ते ५ वेळा हा रेपो दर वाढवण्यात आला होता. त्यामुळे आधीच हप्त्याचा भार सहन करत असलेल्या नागरिकांचा हप्ता आणखीन वाढला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात बर्निंग बसचा थरार; आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी

Eknath Shinde News |मुख्यमंत्र्यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद!

Maharashtra Politics 2024 : भाजपसोबत जाण्याचा कधी आणि का घेतला निर्णय?; प्रफुल पटेलांचा पुन्हा गौप्यस्फोट

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

SCROLL FOR NEXT