RBI Repo Rate: रेपो दर वाढणार की कमी होणार? आज होणार फैसला

रेपो दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
RBI Repo Rate Hike
RBI Repo Rate HikeSAAM TV

शिवाजी काळे

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरींग कमीटीची बैठक गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास बैठकीत झालेल्या निर्णयाची घोषणा करणार आहेत. यामध्ये रेपो दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Repo Rate News)

जर रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवला तर सर्वसामान्यांना काय फटका बसेल...?

रिझर्व्ह बँकेकडून देशातील इतर बँका कर्ज घेत असतात. रेपो रेट वाढवला म्हणजे त्या बँकांनी घेतलेल्या कर्जाचा व्याज दर वाढवला. जर रिझर्व्ह बॅकेने रेपो दरात वाढ केली तर रिझर्व्ह बॅकेकडून कर्ज घेणाऱ्या बँकेचे व्याज दर वाढतात. त्यामुळं कर्जदार लोकांवर याचा ताण पडतो...

EMI वाढणार...

गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज यांचे व्याजदर वाढणार, मुदत ठेवींवरील व्याजदर वाढू शकतात. रेपो दर वाढल्यानंतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना फटका बसतो. मात्र, बँकेत फिक्स डिपॉझिट केलेल्या ठेवीदारांना अधिक व्याज मिळते. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ झाली तर बँकेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांना फायदा होतो.

RBI Repo Rate Hike
RBI Repo Rate Hike: कर्जे महाग होणार, तुमचा EMI वाढेल; RBI कडून रेपो दरात वाढ

२५ बेसिस पॉइंट्सने वाढ

महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सने वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दर वाढण्यास सुरूवात झाली.सुरूवातीला यात २.२५ टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर सलग ५ वेळा रेपो दर वाढवण्यात आलेत. सध्या ६.२५ इतका रेपो दर आहे. डिसेंबर २०२२ पासून हे नवे दर लागू करण्यात आले. त्यानंतर रेपो दरात कोणताही बदल झाला नाही. आज हे दर वाढण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com