Ravindra Dhangekar News Saam TV
महाराष्ट्र

Ravindra Dhangekar News: सर्वसामान्यांच्या डोक्यावरचं छप्पर काढणारं बजेट...; अर्थसंकल्पावरून धंगेकरांचं सरकारवर टीकास्त्र

Ravindra Dhangekar On Budget 2024: माध्यमांशी संवाद साधताना धंगेकरांनी पुढे म्हटलं की, गेल्या 10 वर्षात महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव दुप्पट, तिप्पट झाले आहेत. डाळीचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

नितीन पाटणकर

Political news :

काँग्रेस सरकरची जिथे जिथे सत्ता आहे तिथे मोफत वीज दिली जाते. तीच योजना केंद्र सरकारने आज चोरली आणि आपल्या अर्थसंकल्पातून जाहीर केली, अशा शब्दांत आमदार रवींद्र धंगेकर यांनी अर्थसंकल्पावरुन भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

आज सादर झालेले बजेट हे इलेक्शन बजेट आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेले आहे. गेल्या 10 वर्षात लोकांसाठी या सरकारने काहीही केलेले नाही. केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यात, गाजर दाखवण्यात हे 'गुजरात'वाले पटाईत आहेत. पण प्रत्यक्ष लोकांना ते काहीही देत नाहीत, अशी टीका धंगेकरांनी केलीये.

माध्यमांशी संवाद साधताना धंगेकरांनी पुढे म्हटलं की, गेल्या 10 वर्षात महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव दुप्पट, तिप्पट झाले आहेत. डाळीचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता भाजप सरकारला वैतागली आहे. हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर येणाऱ्या काही दिवसात पेट्रोल 200 रुपयांच्या पुढे आणि गॅस 2 हजारच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य माणसांच्या डोक्यावरचे छप्पर सरकारला काढायचे आहे का?, असा सवाल धंगेकरांनी आजच्या बजेटवरून उपस्थित केला आहे.

महागाईला आळा घालण्यासाठी कुठलीही तरतूद या सरकारने आजच्या अर्थसंकल्पात केली नाही. त्यामुळे सर्व सामान्य लोक आजच्या बजेटवर नाराज आहेत. ही नाराजी येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला-आम्हाला पहायला मिळेल, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात सुनावणी

Maharashtra Politics: २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार; राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT