Ravikant Tupkar will form a new group create swabhimani shetkari sanghatana Raju Shetti Saam TV
महाराष्ट्र

Ravikant Tupkar: शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता स्वाभिमानीतही फूट? रविकांत तुपकर दुसरा गट स्थापन करणार, सूत्रांची माहिती

साम टिव्ही ब्युरो

Ravikant Tupkar News: मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत फूट पडून एक वर्षाचा कालावधी उलटला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली. अजित पवार आपल्या समर्थक आमदारांना घेऊन शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्या या फुटीची चर्चा सुरू असतानाच आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षातही फूट पडणार असल्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे दुसरा गट स्थापन करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक आहे.

या बैठकीला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर जाणार नसल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून रविकांत तुपकर हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करणार असल्याची दाट शक्यता आहे.

विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर उघडपणे टीका देखील केली होती. रविकांत तुपकर यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याकडून रविकांत तुपकर यांचे नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. याला खुद्द रविकांत तुपकर यांनी दुजोरा दिला आहे. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता तुपकर स्वाभिमानीत राहणार की वेगळा पर्याय निवडणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT