...अन्यथा विद्युत मंत्र्यांच्या बारा भानगडी बाहेर काढू - रविकांत तुपकर
...अन्यथा विद्युत मंत्र्यांच्या बारा भानगडी बाहेर काढू - रविकांत तुपकर जयेश गावंडे
महाराष्ट्र

...अन्यथा विद्युत मंत्र्यांच्या बारा भानगडी बाहेर काढू - रविकांत तुपकर

अॅड. जयेश गावंडे

अकोला - वीजबिल थकीत असल्याच्या कारणावरून शेतकर्‍यांच्या शेतातील विज बिल कापण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत आहे. हा प्रकार थांबणे आवश्यक आहे. अन्यथा वीज वितरण कंपनीचे कार्यालय पेटून कर्मचार्‍यांना अधिकाऱ्यांना कपडे काढून ठोकू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या कारवाया थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अन्यथा, तुम्ही कोणाच्या विमानात बसता आणि तुमच्या बारा भानगडी बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी ऊर्जामंत्री यांना दिला.

हे देखील पहा -

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोयाबीन आणि कापूस नुकसान भरपाई संदर्भात राज्य सरकार व केंद्र सरकार विमा कंपनीच्या दावणीला बांधला गेला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या विरोधामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात 12 नोव्हेंबर पासून आंदोलन करीत असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारने सोयाबीनची आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर पडले आहेत. पोल्ट्री फॉर्म मालकांची ही मागणी असल्यामुळे सोयाबीन आयात केल्याचे ते सांगत आहे. केंद्र सरकार हे 'कोंबड्या जगवा आणि माणसे मारा, असे धोरण राबवीत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

यासोबतच त्यांनी राज्यातील मंत्र्यांच्या वक्तव्यावरून आक्षेप घेतला. राज्यात सध्या काय सुरू आहे, सकाळ झाली तर आर्यन खान रात्री झालं तरी आर्यन खान यावरच राज्याचे मंत्री नवाब मलिक बोलत आहे. आर्यन खान संडासला कसा जातो, यावरही ते बोलायला मागे राहतील नाही, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे, जावई आणि आर्यन खान यांच्यावरच बोलताना दिसत आहेत. त्यांनी एक वेळ तरी सोयाबीन शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलावे त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा शेतकऱ्यांना त्यांनी एखादवेळेस मिळवून द्यावा, असा टोला ही त्यांनी मारला.कृषी मंत्री दादा भुसे यांनी विमा कंपन्यांना विमा देण्याचा आदेश काढला असल्याचे म्हणतात. मात्र हा आदेश विमा कंपन्यांनी फाट्यावर लटकला आहे. केंद्र व राज्य सरकार विमा कंपनी यांच्यासोबत साटेलोटे करीत असल्याचा आरोप त्यांनी करीत शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला अर्ज?

SCROLL FOR NEXT