uddhav thackeray, navneet rana, ravi rana saam tv
महाराष्ट्र

BJP : 'हनुमान चालिसेला विराेध केल्यानं श्रीरामनं धनुष्यबाण हिसकावला'

खासदार राणांना १४ दिवस उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या माध्यमातून तुरुंगात टाकलं.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Hanuman Chalisa : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंधेरीत हाेणा-या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि चिन्हं वापरण्यासाठी तात्पूरती मनाई केली आहे. त्यानंतर दाेन्ही गटाकडून नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी दावा केला जात आहे. दरम्यान या घडमाेडी सुरु असतानाच आमदार रवी राणा (ravi rana) यांनी उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणण्यासाठी अटकाव केल्यानं प्रभु रामानं त्यांचं धनुष्यबाण हिसाकावून घेतलं अशी टीका केली आहे. (Maharashtra News)

आमदार रवी राणा म्हणाले उद्धव ठाकरे यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्यासाठी मनाई केला. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी लाॅकअपमध्ये टाकले. एका महिलेला पाेलीसांच्या माध्यमातून त्रास दिला. (Ravi Rana Latest News)

खासदार राणांना १४ दिवस उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या माध्यमातून तुरुंगात टाकलं. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यांनी हनुमान चालीसेचा विरोध केल्यानेच श्रीराम भगवान यांनी उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावून घेतलं असेही आमदार राणा यांनी नमूद केले. (Uddhav Thackeray News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॉक्रोच जनता पार्टीची ५ आणि ६ ऑगस्ट रोजी रणनीती बैठक

Fashion Tips : स्किन टोननुसार हेअर कलर कसा निवडावा? जाणून घ्या परफेक्ट शेड्स

दररोज मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते का?

LPG Gas KYC Update : १० दिवसात e-KYC करा, अन्यथा सिलिंडर दुपट्टी दराने करावा लागेल खरेदी, वाचा नियम

Actor in Old Age Home: १०० चित्रपटात काम केलं; पण आज अभिनेत्याकडे औषधांसाठीही पैसे नाहीत, वृद्धाश्रमात काढतायेत दिवस

SCROLL FOR NEXT