police Saam tv
महाराष्ट्र

Saturday Nightला बिल्डरकडून रेव्ह पार्टी, मुंबईहून ४ तरूणीही बोलावल्या; पोलिसांकडून सिनेस्टाईल भंडाफोड

Rave Party Raided in Nagpur: नागपूरच्या कामठी भागातील एका फार्महाऊसवर शनिवारी रात्री सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.

Bhagyashree Kamble

नागपूरच्या कामठी येथे शनिवारी रात्री रंगलेल्या रेव्ह पार्टीचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. तसेच हा प्रकार उघडकीस आणला आहे. या छाप्यात पोलिसांनी एक बिल्डर, दोन प्रॉपर्टी डिलर आणि एका व्यावसायिकाला अटक केली आहे. तसेच, मुंबईहून बोलावण्यात आलेल्या चार तरुणींनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कामठी येथे शनिवारी रात्री ‘एस फार्म’ नावाच्या फार्महाऊसवर रेव्ह पार्टी सुरू होती. या रेव्ह पार्टीमध्ये सुनिल अग्रवाल, गौतम सुशील जैन, नीलेश बाबुलाल गडिया आणि मितेश मोहनलाल खक्कर यांचा समावेश होता. या आरोपींमध्ये एक जण बिल्डर असून, सुनील आणि त्याचे २ मित्र, प्रॉपर्टी डिलर असल्याची माहिती समोर आली आहे.

या रेव्ह पार्टीत ड्रग्ज, एमडी, हुक्का आणि ब्रँडेड अल्कोहोलची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या फार्म हाऊसवर मुंबईहून चार तरूणींना देखील बोलावण्यात आलं होतं.

फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर, साहाय्यक आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री १ वाजता पोलिसांनी छापा टाकला.

पोलीस पथकाने छापा टाकत चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तसेच फार्म हाऊसवर मुंबईहून आलेल्या ४ तरूणींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांनी फार्महाऊसवरून १.३१ ग्रॅम एमडी, हुक्क्याचे साहित्य, दारूच्या बाटल्या, ६ मोबाईल, २ कार आणि इतर साहित्य मिळून एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वायुसेनेच्या माध्यमातून नीट परिक्षेच्या प्रश्न पत्रिका नागपूरात पोहचल्या

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT