Uddhav Thackeray News saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: शिवरायांच्या मूर्तीची किंमत ₹ ५०००, बाळासाहेबांच्या खुर्चीची ₹ १०००० ; कोकणातील सभेत उद्धव ठाकरे संतापले

Uddhav Thackeray was furious at the meeting in Konkan: उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचा झंझावात दौरा राजापूरमध्ये पोहोचला असून दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. राजापुरमधील जवाहर चौकात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेतून ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, प्रतिनिधी|ता. ५ फेब्रुवारी २०२४

Uddhav Thackeray Sabha Rajapur:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका सध्या कोकणामध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेचा झंझावात दौरा राजापूरमध्ये पोहोचला असून दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज राजपुरमधील जवाहर चौकात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेतून ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"इथे भगव्या टोप्या आहेत. इथे मुस्लिम समाज आहे. रायगडमध्ये मला मुस्लिम समाजाने मराठी कुराण दिलं. त्यांना आपलं हिंदुत्व समजलं आहे. आपलं हिंदुत्व धर्मधर्मात आग लावणारं नाही, असे म्हणत आज राजनची पाठ थोपटायला आलोय, संकटाच्या काळात कोण पाठी उभं राहतं ते त्यांना कळतं," असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

एसीबीच्या धाडीवरुन संतापले...

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ACB ने आमदार राजन साळवी यांच्या घरातील संपत्तीची किंमत केलेली यादी वाचून दाखवली. "या यादीवर सुशांत चव्हाण नावाच्या व्यक्तीची सही आहे. सावंत मराठी वाटतोय, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत 5 हजार लावली, बाळासाहेब ठाकरे फोटो आणि खुर्ची दहा हजार रुपये लावली, असे सांगत तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्याची किंमत करता येणार नाही," अशा शब्दात ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा...

"शिंदेंना (Eknath Shinde) त्यांच्या वडिलांची किंमत कळाली नाही म्हणून माझा बाप चोरत आहेत. राजन साळवीच्या विरोधात कोणी तक्रार केली,काय मिळालं तुम्हाला? सत्ता येते जाते, अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो. वेळ बदलते. कोणाला सोडणार नाही, असा इशारा देत राजनच्या विरोधात जो उमेदवार आहे तो जे पैसे वाटतोय त्याची चौकशी करा," असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT