Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: कशेडी घाटात डिझेलचा टँकर उलटला; मोठी दुर्घटना टळली

कशेडी घाटात डिझेलचा टँकर उलटला; मोठी दुर्घटना टळली

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्‍नागिरी : घाटातील उतारात ब्रेक न लागल्यामुळे टँकर उलटला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील घटना असून यात टँकर चालक अपघातात (Accident) किरकोळ जखमी झाला आहे. डिझेलचा ट्रँकर असल्‍याने पुढची दुर्घटना टाळण्यासाठी घटनास्थळी लागलीच अग्निशमन दलाचे (Fire Brigade) बंब दाखल झाला. (Breaking Marathi News)

मुंबई- गोवा महामार्गवर कशेडी घाटात आज दुपारी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार डिझेलचा टँकर उलटून अपघात झाला. घाटातील तीव्र उतारात ब्रेक न लागल्यामुळे टँकरला अपघात झाला. या टँकरमध्ये जहाजासाठी इंधन म्हणून वापरले जाणारे डिझेल असल्याने सुरक्षेसाठी पोलिसांनी घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब पाचारण केले आहेत.

घाटातील वाहतूक सुरळीत

महामार्ग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समीर सुर्वे, हेडकॉन्स्टेबल साखरकर, होमगार्ड सचिन कडू, विशाल गोगेकर, तांबे, साळुंखे, शिंदे यांनी मदतकार्य केले. सध्या घाटातील वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेत सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT