Kirit Somaiya Saam Tv
महाराष्ट्र

Kirit Somaiya: उद्धव ठाकरेंचे पोलीसही उद्धट, पोलिसांनी थांबवल्यानंतर किरीट सोमय्यांची संतप्त प्रतिक्रिया

कशेडी घाट उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आणि त्यांची गाडी थांबवली.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अनिल परबांच्या बेकायदेशीर रिसॉर्टवर हातोडा घेऊन जात असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना दापोली पोलिसांनी थांबवली. कशेडी घाट उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आणि त्यांची गाडी थांबवली. त्यानंतर तेथे एकच गोंधळ माजला. यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना नोटिशीबाबत विचारणा केली असता, पोलिसांनी काहीही उत्तर दिलं नाही, फक्त तुम्ही नोटीस स्वीकारा असं ते म्हणाले. त्यावेळी संतप्त किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंचे पोलीसही उद्धट आहेत, असं ते म्हणाले (Ratnagiri Khed Police stopped Kirit Somaiya).

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील अनिल परब (Anil Parab) यांच्या बेकायदेशीर रिसॉर्टवर हातोडा मारुया, म्हणत माजी खासदार किरीट सोमय्या हे दापोलीच्या दिशेने निघाले आहेत. अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाईची मागणी सोमय्यांनी केलीये.

खेड पोलिसांकडून सोमय्यांना नोटीस

खेड पोलिसांकडून कशेडी घाट उतरताच किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) ही नोटीस बजावण्यात आली. 149 ची ही नोटीस आहे. ही नोटीस घेण्यास किरीट सोमय्यांनी नकार दिला आहे. साई रिसॉर्ट हा बंद आहे त्यामुळे त्या ठिकाणी जाऊ नये, असं सांगितलं.

त्यावर किरीट सोमय्या यांनी ही नोटीस का बजावण्यात आलीये याबाबत पोलीस निरिक्षकांना सांगितलं. मात्र, खेडच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक निशा जाधव यांनी किरीट सोमय्या यांना ही नोटीस दिली. ही नोटीस आपण स्विकारणार नाही मात्र, या नोटीशीचं कारण आपण न्यायालयात विचारु असं किरीट सोमय्या म्हणाले.

तसेच, त्यांनी सरकारवरही निशाणा साधलाय. पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. उद्धव ठाकरेंचे पोलीसही उद्धट आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा दापोलीच्या दिशेने रवाना झालेत.

किरीट सोमय्या दापोली पोलिसांत तक्राक दाखल करणार होते

दापोली (Dapoli) पोलीस ठाण्यात जाऊन किरीट सोमय्या हे तक्रार दाखल करणार होते. मात्र, दापोली पोलीस ठाण्याबाहेरही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT