Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला एसीबीची नोटीस; राजकीय वर्तुळात खळबळ

दापोली विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जितेश कोळी

Ratnagiri Political News : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना एसीबीने नोटीस बाजावल्याने खळबळ उडाली आहे.

माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) हे लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असतानाच त्यांना ही नोटीस बाजवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सन 2014 ते 2019 या कालावधीत आमदार म्हणून कार्यरत असताना संजय कदम यांनी बेकायदेशीरपणे इमारती व क्रशर उभारल्याची तक्रार झाली असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध होत आहे.

इमारत बांधताना विहीर बुजवल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली असून माजी आमदार संजय कदम हे या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांचे कट्टर विरोधक म्हणून माजी आमदार संजय कदम यांना ओळखले जाते. आता एसीबीची (ACB) नोटीस निघाल्याने दापोली विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT