rasta roko andolan in malshiras for dhanghar reservation, pandharpur news saam tv
महाराष्ट्र

Dhangar Aarakshan Andolan : धनगर आरक्षणासाठी माळशिरसला रास्ता राेकाे; पुणे, पंढरपूर, सातारा रस्त्यावरील वाहतूक खाेळंबली

चौंडी येथील धनगर बांधवांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून आता धनगर समाज आक्रमक झाला आहे.

भारत नागणे

Pandharpur News : धनगर समाजाने धनगर आरक्षण मिळावे यासाठी आज (गुरुवार) पंढरपूर जिल्ह्यातील माळशिरस येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदाेलनामुळे पुणे, सातारा, पंढरपूर आणि अकलूज रस्त्यावरील वाहतूक २ तासाहून अधिक काळ ठप्प झाली हाेती. (Maharashtra News)

माळशिरस तालुक्यातील धनगर समाज आता आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आता धनगर समाजाने रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे.

माळशिरस तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन केला. धनगर समाजाच्या आरक्षणाचा अंमल बजावणी करत, धनगरांच्या विविध मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात अशा मुख्य मागणीसाठी धनगर समाजाने रास्ता रोको केला.

२ तासाहून अधिक काळ वाहतुक ठप्प

त्यामुळे पुणे, पंढरपूर , सातारा आणि अकलूज रस्त्यावरील वाहतूक सुमारे २ तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती. राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक असताना चौंडी येथील धनगर बांधवांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून आता धनगर समाज आक्रमक झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT