mercedes controversy rashmi thackeray vs neelam gore saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नीलमताई विरुद्ध रश्मी वहिनी! मर्सिडीजचे आरोप, रश्मी ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर? पाहा स्पेशल रिपोर्ट

Shivsena Politics : नीलम गो-हेंनी मातोश्रीवर खळबळजनक आरोप केल्यामुळे थेट आता रश्मी ठाकरेच अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. गो-हेंविरोधात त्यांनी आपली फौज मैदानात उतरवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. रश्मी ठाकरेंनी नेमकी काय रणनीती आखलीय त्यावरचा विशेष रिपोर्ट.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

2 मर्सिडीज द्या आणि पदं घ्या असा आरोप मातोश्रीवर करणाऱ्या नीलम गोऱ्हेंच्या विरोधात थेट रश्मी वहिनीच मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी ठाकरे गटाची महिला आघाडी अ‍ॅक्टिव्ह करत मुंबई आणि पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक घेतलीय. या बैठकीत नीलम गोऱ्हेंच्या विरोधात रणनीती आखल्याची माहिती सुत्रांनी दिलीय आणि त्याचाच भाग म्हणून सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळेच गोऱ्हेंनी माफी मागितली तरी त्यांची आता सुटका नाही असा इशाराच अंधारेंनी गोऱ्हेंना दिलाय.

नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका केल्यानंतर पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी थेट नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर तीव्र आंदोलन केलं. एवढंच नाही तर गोऱ्हेंच्या विधानाचे मुंबईतही पडसाद उमटले. मुंबईतील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोरच्या गोऱ्हेंच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करत निषेध व्यक्त केला. हे असं असलं तरी रश्मी ठाकरेंनी घेतलेली बैठक ही गोऱ्हेंच्या विधानाबाबत नसल्याचं स्पष्टीकरण ठाकरे गटाने दिलंय.

गोऱ्हेंच्या वक्तव्यामुळे दोन्ही शिवसेनेतील संघर्ष टोकाला जाणार हे निश्चित. मात्र गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर अ‍ॅक्टिव्ह मोडवर आलेल्या रश्मी ठाकरे आगामी काळात शिंदे गटाविरुद्ध आणखी आक्रमक होणार की गोऱ्हेंचा मुद्दा मागे पडल्यानंतर पुन्हा कोशात जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur-Karjat : बदलापूर-कर्जतसाठी मोदींनी घेतला मोठा निर्णय, लोकल प्रवास होणार सुसाट, मुंबई-पुणेकरांसाठीही फायदा

Maharashtra Live News Update : पुण्यात दिवसा ऊबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी

Shani Gochar 2026: 2026 साली या राशींचं भाग्य उजळणार; नवी नोकरी पैसा मिळून तुम्ही होणार करोडपती

Gold Rate Prediction: सोन्यात आता ५ लाख गुंतवले तर २०३० मध्ये किती रिटर्न मिळणार? वाचा कॅल्क्युलेशन

Sangli Politics : सांगलीत प्रचारादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा, दोन गट आपापसात भिडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT