"प्रजासत्ताक दिनीच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान; त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा" Saam TV
महाराष्ट्र

"प्रजासत्ताक दिनीच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान; त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा"

'राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत आहेत. मात्र, रश्मी ठाकरे या सलामी देत नाहीत त्या फक्त उभ्या होत्या. त्यांनी ध्वजाला सलामी का दिली नाही? त्यांना संविधान मान्य नाही का?'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - भारतीय प्रजासत्ताक दिनी (Republic Day) वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी (CMs wife) आणि 'सामना' मुखपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांनी (Rashmi Thackeray) यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला असल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे.

वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या ध्वजारोहनानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोवरती अॅड. जयश्री पाटील यांनी आक्षेप घेत लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत आहेत मात्र, रश्मी ठाकरे या सलामी देत नाहीत त्या फक्त उभ्या होत्या. त्यांनी ध्वजाला सलामी का दिली नाही? त्यांना संविधान मान्य नाही का? आणि त्यांच्या या कृत्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला आहे. तसेच, त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना देखील दुखावलेल्या आहेत, असं म्हणत या प्रकरणी रश्मी ठाकरेंच्या विरोधात अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील (Dr. Jayashree Patil) यांनी पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.

हे देखील पहा -

तसंच या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरेंवरती कारवाई करावी अशी मागणी अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे केलीय. दरम्यान, सार्वजनिक जीवनात ध्वजसंहितेचा अपमान करणे हे भारतीय नागरिकांच्या भावनांचा सार्वजनिकरित्या अपमान केल्या सारखं असून राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रगीताचा अपमान या संबंधी रश्मी ठाकरे यांच्याकडून अक्षम्य अपराध झाल्याने त्यांच्यावरती गुन्हा नोंदवावा असंही पाटील म्हणाल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं दिली प्रेमाची कबुली, होणारा नवरा आहे तरी कोण? पाहा रोमँटिक PHOTOS

Panchang Today: मंगळवारी मघा नक्षत्र व शोभन योग; आज कोणत्या राशींना मिळणार यश?

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंच्या सभेसाठी कुडाळमध्ये जय्यत तयारी

Mumbai Traffic New Rules: काय सांगता! मुंबईत अवजड वाहनांना बंदी, वाहतुकीचे नवीन नियम काय आहेत?

SCROLL FOR NEXT