बीडचा राज्यात डंका; नॉर्मल डिलिव्हरीमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर Saam TV
महाराष्ट्र

बीडचा राज्यात डंका; नॉर्मल डिलिव्हरीमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर

अतिरिक्त संचालक, कुटूंब कल्याण कार्यालय, पूणे यांचे अहवालानुसार राज्यामध्ये नॉर्मल डिलेव्हरी व पीपीआयूसीडी कार्यक्रमामध्ये बीड जिल्हा सर्व प्रथम आहे.

विनोद जिरे

बीड जिल्ह्याचा आरोग्यविषयक कामात राज्यात डंका निर्माण झाला आहे. गेल्या डिसेंबर 2021 अखेर माता व बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत, विविध निर्देशकांचा नुकताच राज्यस्तरीय आढावा घेण्यात आलाय. यामध्ये बीड जिल्हयाचे (Beed) काम कुटूंब कल्याण कार्यक्रमांतर्गत राज्यात पहिले असल्याचं स्पष्ट झालं आहे. अतिरिक्त संचालक, कुटूंब कल्याण कार्यालय, पूणे यांचे अहवालानुसार राज्यामध्ये नॉर्मल डिलेव्हरी व पीपीआयूसीडी कार्यक्रमामध्ये बीड जिल्हा सर्व प्रथम आहे.

त्या अनुषंगाने शासकिय रुग्णालयामध्ये 1 एप्रिल 2021 ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीत 33 हजार 269 प्रसूती झाल्या आहेत. त्यापैकी बीड जिल्हा रुग्णालयात 5 हजार 427 प्रसूती झाल्या असून 2229 महिलांना पीपीआयूसीडी बसविण्यात आल्या आहेत. त्याचे प्रमाण नियमाप्रमाणे 25 एकके अपेक्षित आहे, मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या योग्य नियोजनातून ही टक्केवारी 41.6 टक्के एवढे वाढवण्यात यश आले आहे.

दरम्यान कुटूंब नियोजनासाठी प्रसृती पश्चात पीपीआयूसीडी बसवणे हे फायदेशीर व अतिशय सूरक्षित आसून सर्व गर्भवती महिलांनी प्रसूती नंतर पीपीआयूसीडी बसवूण मिळणाऱ्या शासकीय अनुदानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ.सुरेश साबळे यांनी केलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT