bjp logo, Ranjitsinh Naik Nimbalkar News, BJP News Updates, Ranjitsinh Naik Nimbalkar latest Marathi news saam tv
महाराष्ट्र

'पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजप असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देईन'

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र आजही निषेध नाेंदविला जात आहे.

ओंकार कदम

सातारा : राष्ट्रवादीचे (ncp) नेते खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नाेंदवित हा हल्ला पक्षानं केल्याचे सिद्ध झाल्या मी खासदार पदाचा राजीनामा देईन असे माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) यांनी येथे नमूद केले. (Ranjitsinh Naik Nimbalkar News)

राज्यातील काही एसटी (msrtc) कर्मचा-यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर काही दिवसांपुर्वी हल्ला केला. या हल्ल्याचा राष्ट्रवादीसह विविध पक्षातील नेत्यांनी निषेध नाेंदविला. काहींना हा भाजपनं (bjp) रचलेला कट असल्याचे आराेप केले आहेत.

माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या हल्याचा निषेध व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) या पुढे नसत्या आल्या तर नक्कीच दुर्घटना घडली असती असे नमूद केले. रणजीतसिंह म्हणाले पवार साहेबांच्या आम्ही राजकीय विरोधक असलो तरी ते महाराष्ट्राचं एक मोठ नेतृत्व आहे. त्यांचा आदर महाराष्ट्राचे नेते म्हणून नक्की आम्हाला आहे. या प्रकरणात भाजपचा हात असेल तर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देईन कारण मला माझ्या पेक्षा जास्त देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि भाजपच्या संस्कृतीवर विश्वास आहे असे रणजीतसिंह यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : समुद्रकिनारी उभा असलेला पालघरमधील 'हा' भव्य ऐतिहासिक किल्ला, देतोय मराठ्यांच्या शौर्याची साक्ष

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

पुण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! आठव्या वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला बदलणार?

Maharashtra News Live Update: आसाममध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT