Mahaganpati News saam tv
महाराष्ट्र

Ranjangaon Ganpati: उन्हाची दाहकता कमी व्हावी म्हणून महागणपतीला चंदन उटीचा लेप, १००१ चिकूंचा नैवेद्य

Mahaganpati News: ग्रीष्मातील वाढती उष्णता लक्षात घेता १ मे रोजी रांजणगाव येथील महागणपतीला पारंपारिक पद्धतीने चंदन उटीचा लेप लावण्यात आला.

साम टिव्ही ब्युरो

Ranjangaon Mahaganpati: ग्रीष्मातील वाढती उष्णता लक्षात घेता १ मे रोजी रांजणगाव (ता. शिरूर) येथील महागणपतीला पारंपारिक पद्धतीने चंदन उटीचा लेप लावण्यात आला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महागणपती मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी महागणपतीला एक हजार एक चिकूंचा नैवेद्य दाखविण्यात आला.

मे महिना हा तीव्र उन्हाचा समजला जातो. या महिन्याच्या सुरवातीलाच महागणपती मूर्तीची दाहकता कमी व्हावी यासाठी पारंपारिक पद्धतीने मृदू, पवित्र चंदन उटी केली जाते. आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मुख्य गाभाऱ्यात रंगीबेरंगी व सुगंधी फुलांची सजावट करण्यात आली होती.

पहाटे साडेपाचच्या सुमारास अभिषेक घातल्यानंतर, श्रीं च्या मूर्तीला मंत्रोच्चाराच्या घोषात विधीवत चंदन उटीचा लेप लावण्यात आला. गणेश भक्त सुरेंद्र वधवा यांना चंदन उटीचा मान मिळाला. दुपारी बारा वाजता रांजणगाव गणपती (Mahaganpati) देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर महागणपतीला एक हजार एक चिक्कूंचा महानैवेद्य करण्यात आला.

उद्योजक सचिन दुंडे यांनी नैवेद्याची फळे महागणपतीला अर्पण केली. रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांच्या हस्ते या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थान चे उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय पाचुंदकर, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. सायंकाळच्या आरतीनंतर, गणेशभक्तांना चिकूचा प्रसाद वाटण्यात आला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

SCROLL FOR NEXT