Dharashiv News  saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : आईने तिन्ही चिमुकल्यांसह संपवलं जीवन, ग्रामस्थांची पतीवर कारवाईची मागणी, मृतदेह स्विकारण्यास विराेध

Mother Passed Away along Three Kids: पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- कैलास चाैधरी

Dharashiv News : धाराशिव तालुक्यातील कोंड येथे एका महिलेने तीन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पतीने दारू पिऊन मारहाण केल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे. (Breaking Marathi News)

या घटनेबद्दल घटनास्थळावरुन मिळालेले माहिती अशी - राणी बनसाेडे यांचे पती बबन यांची नाेकरी गेली. त्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत आले होते. त्या तणावातून पती बबन बनसोडे यांना दारूचे व्यसन लागले. ते दारु पिऊन घरच्या लाेकांना त्रास देत असे. (dharashiv news)

त्यामुळे त्रासाला कंटाळून बबन यांच्या पत्नी राणी बनसोडे या महिलेने राजनंदीनी या सात महिन्याच्या मुलीला घेऊन आणि इतर दोन मुलं अनुषका व राजविर यांना घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोंड गावात दारूबंदी ठराव घेऊनही व वारंवार निवेदन देऊनही अवैध दारूविक्री सुरुच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी व प्रशासन जोपर्यंत कारवाई करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT