Ramdas Kadam Saam TV
महाराष्ट्र

Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांची टोलेबाजी; म्हणाले,'ते इथे सभा घ्यायला अफझल खानासारखे आले...'

Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: रामदास कदम यांनी खेडमध्ये झालेल्या सभेवरून हल्लाबोल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सातत्याने शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. यामध्ये आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काही दिवसांपूर्वी खेडमध्ये झालेल्या सभेवरून हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या सभेत अफजलखान असल्यासारखे आले होते, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे.(Political News)

खेडमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील सर्वच नेत्यांवर सडकून टीका केली. त्यानंतर आता शिंदे गटातील नेते देखील त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. "मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे अडीच वर्षात कधीही बाहेर पडले नाहीत. तेव्हा बळीराजा कुठे गेला होता आणि त्यांचं शहाणपण तेव्हा कुठे गेलं होतं?, असा प्रश्न रामदास कदमांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे इथे सभा घ्यायला अफझल खानासारखे महाराष्ट्रामधून सर्व लोकांना घेऊन आले. आता त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सभा घेतोय. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी बळीराजासाठी एकही निर्णय घेतला नाही.”

उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये काही दिवसांपूर्वी जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर जी काही टीका केली त्या सर्वांवर उत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून देखील सभा घेतली जाणार आहे. खेडमध्ये ज्या मैदानात ठाकरे गटाची सभा पार पडली त्याच ठिकाणी सभा घेत शिंदे गटातील नेते त्यांना प्रत्युत्तर करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

Income Tax Return: करदात्यांनो सावधान! यंदा 'ITR' भरताना 'ही' एक चूक पडेल महाग; थेट येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस

Maharashtra News Live Update : लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी, पर्यटकांची पर्यटनासाठी वाढली येण्याची शक्यता..

Beed : 'जिवंत सोडणार नाही' म्हणत तरुणावर तलवारीने सपासप वार; बीडमधील खळबळजनक घटना

चेहऱ्यावर हवीय नैसर्गिक चमक? महागडे फेशिअल सोडा आणि रोज 'या' पद्धतीने लावा बर्फ

SCROLL FOR NEXT