Union Minister Ramdas Athawale  Saam Tv
महाराष्ट्र

...तर त्या पक्षाचा सत्यानाश होतो; केंद्रीय मंत्री आठवलेंनी सांगितला ३५ वर्षांचा इतिहास

महाराष्ट्रात माझा पक्ष ज्या पक्षासोबत जातो, त्यांची सत्ता येते. ज्यांच्या विरोधात जातो, त्यांचा सत्यानाश होतो - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Vishal Gangurde

RPI जिथे जाते तिथे सत्ता, विरोधात गेल्यास त्यांचा सत्यानाश होतो, असा रामदास आठवलेंचा राजकीय इशारा

आठवलेंनी यावेळी ३०–३५ वर्षांचा राजकीय इतिहास सांगितला

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरपीआयचा महत्त्वपूर्ण मेळावा पार पडला

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष सक्रिय झाले आहेत. महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या आठवलेंच्या आरपीआय पक्षाने निवडणुकीसाठी चाचपणी सुरु केली आहे. आरपीआयचे विविध महापालिका क्षेत्रात कार्यकर्त्यांचे मेळावे होत आहेत. कल्याण पूर्वमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री आठवलेंनी महायुतीच्या घटक पक्षाला मोठा इशारा दिला आहे.

कार्यकर्ता मेळाव्यात भाषण करताना आठवले म्हणाले, महाराष्ट्रात माझा पक्ष ज्या पक्षासोबत जातो त्यांची सत्ता येते. ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो. हा ३०–३५ वर्षांचा इतिहास आहे. आरपीआयने आधी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. तेव्हा त्यांची सत्ता आली होती. आज भाजप-शिवसेना सोबत आल्याने महायुतीची सत्ता स्थिर आहे'.

आठवले यांनी आपल्या पक्षाची ताकद अधोरेखित करताना म्हटले, आपली ताकद मोठी आहे. कुणाला सत्ता द्यायची, कुणाला बाहेर काढायची जबाबदारी आमच्यावर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख त्यांनी केला. बाळासाहेबांनी भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र यायला हवे, असे सांगितले होते. मी तो धाडसी निर्णय घेतला, असेही आठवलेंनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेण्यात आला आहे. आरपीआयने महायुतीसोबत एकजूट दाखवत निवडणूक रणधुमाळीत स्वतःचे अस्तित्व आणि आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : केसांमध्ये कोंडा झालाय? मग वापरा हि नवीन रेमेडी

Sara Arjun: धुरंधर फेम अभिनेत्रीचा पाहा शाही थाट, ग्लॅमरस पाहून नेटकरी थक्क

Chicken Rassa Recipe: गावरान स्टाईल झणझणीत चिकनचा रस्सा कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये अजित पवार गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

BEST Bus Accident : भावाचं लग्न आटोपून वर्षा घरी निघाली, पण वाटेतच काळाचा घाला; बेस्ट बसने चिरडल्याने नर्सचा मृत्यू

SCROLL FOR NEXT