Ram Khade allegations against MLA Gopichand Padalkar  Saam TV News
महाराष्ट्र

देवाचा सातबारा पडळकरांच्या नावावर? महायुतीचा आमदार गोत्यात? कुणी लाटली ३४ एकर जमीन?

Gopichand Padalkar : आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही मोठा आरोप करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी पडळकरांवर काय आरोप केलेत पाहूया.

Tanmay Tillu

मुंबई : महायुती सरकारमधील मंत्री, आमदार आणि नेत्यांचे आता कारनामे समोर येत असून यामुळे विधीमंडळात जोरदार चर्चा आणि वाद होतायत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचे नेते धनंजय मुंडेंवर आरोप झाल्याने त्यांना मंत्री पद सोडावं लागलंय. दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि जयकुमार गोरे यांच्यावरही आरोप झालेत. त्यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही मोठा आरोप करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी पडळकरांवर काय आरोप केलेत पाहूया.

खाडेंचे आरोप, पडळकर अडचणीत?

आमदार गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानची जमीन लाटल्याचा आरोप

सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंचे आरोप

३४ एकर जमीन पडळकरांनी लाटल्याचा दावा

मंत्री चंद्रकांत पाटील, सुरेश धस, प्रकाश सोळंकेंच्या कार्यकाळातील घोटाळा

देवस्थानची जमीन खालसा करण्याचा व्यवहार

व्यवहारात चंद्रकांत पाटील यांनी मदत केल्याचा आरोप

दरम्यान, हे प्रकरण विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच समोर आल्याने आता एकच खळबळ उडाली आहे. तर यासंदर्भात पडळकरांनी आपली भूमिका मांडली आहे. महायुतीत सरकार मंत्री आणि काही नेत्यांमुळे अडचणीत आलंय. विविध वक्तव्य आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सरकारमधील पहिली विकेट पडलीये. तर पुढच्या सहा महिन्यात दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा पडेल असा दावा विरोधक सातत्यानं करतायत.त्यामुळे महायुतीसाठी काळ खडतर असल्याचं दिसतंय. यातून महायुती तरणार की राजीनाम्यांमुळे सरकारला धक्के बसत राहणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Account Portability: अकाउंट नंबर तोच राहणार पण बँक बदलणार; RBI नवीन सुविधा करणार सुरु

Adhar Card : फक्त QR कोड स्कॅन करा; सेकंदात खरे अन् बनावट आधार कार्ड ओळखा, कसं? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Pune: ड्युटीवर जातो म्हणत घराबाहेर गेले, फोनही बंद ठेवला अन् सीआरपीएफ जवान प्रशांत कदम यांचा अपघातात मृत्यू

Summer Health Care: कडक उन्हामुळे त्रास होतोय? सतत आजारी पडताय? 'हे' उपाय ठरतील रामबाण इलाज

SCROLL FOR NEXT