Raksha Bandhan 2026 gold price drop in Jalgaon today saam tv
महाराष्ट्र

रक्षाबंधनाला खरेदीची गोल्डन संधी; सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत 22K, 24K चा आजचा भाव किती?

Today 22K and 24K gold rate in Jalgaon Maharashtra: रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. 22K आणि 24K सोन्याचा आजचा भाव तसेच चांदीचे ताजे दर जाणून घ्या.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव: सुवर्ण बाजारात सातत्‍याने चढउतार होत असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. मागच्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्‍या दरात घसरण होत आहे. रक्षाबंधन सणाच्‍या आदल्‍या दिवशी मोठी घसरण झाली आहे. यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत होत असलेल्‍या बदलामुळे सुवर्ण बाजारात सातत्‍याने चढउतार होत असल्‍याचे चित्र आहे. मागील महिन्‍यात सोने आणि चांदीच्या दराने उच्‍चांक गाठला होता. यानंतर थोडा दिलासा मिळाला होता. तर या महिन्‍याच्‍या सुरवातीला देखील सोने-चांदीचे दर चढते राहिले होते. मध्‍यंतरी दर स्‍थीरावले असताना मागील आठवड्यात मोठी घसरण झाली होती. मात्र या आठवड्याच्‍या सुरवातीलाच दर काहीसे वाढले असताना मागील दोन दिवसांपासून दरात घसरण झाली आहे.

3 हजाराने दर झाले कमी

सुवर्ण बाजारात बुधवारी (ता.२६) सोन्याचा भाव 1 लाख ६१ हजार ३०० (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. यात आज (ता.२७) तीन हजार रूपयांची घसरण झाली असून सोन्याचा भाव 1 लाख ५८ हजार ३०० रूपयांवर आला आहे. तर बुधवारी चांदी 2 लाख ४८ हजार (प्रतिकिलो, विनाजीएसटी) होती. आज 3 हजार रूपयांची घसरण झाली असून चांदी 2 लाख ४५ हजार रुपयांवर (प्रतिकिलो, विनाजीएसटी) आली आहे.

रक्षाबंधनाच्‍या पार्श्वभूमीवर दिलासा

मागील दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्‍या दरात घसरण होत आहे. यामध्ये चांदीचे दर अधिक खाली आले असून रक्षाबंधन सणाच्‍या पार्श्वभूमीवर कमी झालेले दर दिलासा देणारे आहेत. प्रामुख्‍याने भावांसाठी चांदीच्‍या राखी घेणाऱ्या बहिणींना चांदीचे कमी दर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT