Rajya Sabha Election 2022 News, Bacchu Kadu News in Marathi SAAM TV
महाराष्ट्र

...तर राज्यसभेला शेवटच्या ५ मिनिटांत मतदान करू; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांनाच इशारा

राज्यसभेच्या निवडणुकीत अखेरच्या पाचव्या मिनिटांत मतदान करू, असे वक्तव्य करून बच्चू कडूंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

साम ब्युरो

अमर घटारे

अमरावती: राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक भाजप आणि शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच अपक्ष आमदारांना महत्व आलं आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निवडणूक मतदानाबाबत वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू, असे बच्चू कडू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. (Bacchu Kadu News in Marathi)

राज्यसभेची निवडणूक होत असून, राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आणि शिवसेनेसाठी (BJP-Shivsena) ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. महाविकास आघाडीनं 'महाप्लान' ठरवला असून, भाजपनंही रणनीती आखली आहे. प्रत्येक अपक्ष आमदाराचं मत मोलाचं ठरणार आहे. त्यामुळे त्यांचं महत्व प्रचंड वाढलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारनं करावी, अन्यथा त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील, असे बच्चू कडू म्हणाले.

सध्या धान आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारनं जे खरेदीचे लक्षांक दिले, ते कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. पण आता केंद्र सरकारनं खरेदीसाठी हात वर केलेत. धान उत्पादक शेतकरी देखील चार ते पाच लाख असून, केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहे. केंद्रानं खरेदी सुरू करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे. खरेदी होत नसेल तर, किमान चार हजार रुपये प्रती एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले. तसे झाले नाही तर, आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, असा इशारा बच्चू कडूंनी दिला. आमचं मतदान भाजपला जाणार नाही. आम्ही आघाडीलाच मतदान करू. मात्र शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

रवी राणांना टोला

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी आमदार रवी राणा यांना टोला लगावला. रवी राणा यांच्या संपर्कात कोण आहे, हे शोधण्यासाठी संशोधन करावं याकरिता आयुक्तांना पत्र देणार आहे, असं कडू म्हणाले. रवी राणा यांनी मोठं समजण्याचं कारण नाही. त्यांनी हनुमान चालीसा वाचत बसावी, असंही ते म्हणाले. माझ्या संपर्कात अनेक अपक्ष आमदार आहे हा दावा रवी राणा यांनी केला होता. त्यावर बच्चू कडू यांनी रवी राणा यांना हा टोला लगावला आहे.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT