दिवाळीनंतर तुटणाऱ्या उसाला प्रति टन 3500 रुपये पहिला हप्ता जाहीर करावा, अन्यथा 16 नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. ऊस दराच्या मागणीसंदर्भात राजू शेट्टी यांनी आज पंढरपुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा इशारा दिला.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी 3100 रुपये दर जाहीर केला आहे, तो आम्हाला कदापि मान्य नाही. साखर उताऱ्यानुसार प्रति टन पहिली उचल 3500 रुपये जाहीर करावी, अन्यथा भव्य मोर्चा काढू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी घाईघाईने कारखाने सुरू करून साखर उद्योगाचे वाटोळे केले, असा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला.
रिकव्हरी चोरली जात आहे, याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा शेट्टी यांनी केला. साखरेची एमएसपी 47 रुपये पर्यंत आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीला जिल्ह्यातील एकही कारखानदार गेला नाही, कारखानदारांना माज आला आहे, माज उतरवण्याची वेळ आली आहे, तो कोणत्याही पक्षाचा असू दे, असे शेट्टी म्हणाले.
दरम्यान, उद्यापासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या ऊस तोडी बंद कराव्यात, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे. राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये आता अस्वस्थता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी यांनी 8 दिवसांचा अल्टीमेटम देताना दिवाळीनंतर तुटणाऱ्या उसाला 3650 रुपये दर द्या, कारखाना बंद झाल्यानंतर 100 रुपये आणि परत 200 रुपये द्या, अशी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.