raju shetti answers on sadabhau khot criticism saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti: राजू शेट्टींचा सदाभाऊंच्या टिकेवर पलटवार, सांगलीतील साखर कारखानादारांना दिला इशारा

सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी धडपड करावी आणि निर्णय घेऊन शेतक-यांना दिलासा द्यावा असे राजू शेट्टींनी म्हटले.

विजय पाटील

Sangli News :

कोल्हापूर जिल्ह्यात जसा मसुदा ठरला आहे तसाच मसुदा सांगली जिल्ह्यात राबवावा अन्यथा आंदोलन अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी साखर कारखानादारांना दिला आहे. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत हाेते. (Maharashtra News)

येत्या 26 नोव्हेंबरला सांगली जिल्ह्यातील साखर कारखानादारांची बैठक आहे. या ऊस दराबाबत बैठकीत निर्णय व्हावा असे राजू शेट्टींनी म्हटले. तसे न झाल्यास 27 पासून सांगली जिल्ह्यात प्रत्येक कारखान्या समोर आंदोलन करण्यात येईल असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी धडपड करावी आणि निर्णय घ्यावा.

सदाभाऊंना टाेला

सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांच्यावर बाेलताना राजू शेट्टी यांनी निशाण साधला. गेले 20 वर्षे झाले माझ्यावर आरोप होत आहेत. माझ्या सांगण्यावरून हजारो लोक रस्त्यावर येतात हेच माझे सर्टिफिकेट आहे. कुणा लुल्या सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सदाभाऊ काय म्हणतात हे उत्तर द्यायला मी इथे आलो नाही. त्याच्या पेक्षा वरचे लोक आहेत माझे कार्यकर्ते ते उत्तर देतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT