Rajsthan Salsar Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, भरधाव टेम्पोची कारला धडक; महाराष्ट्रातील ३ जणांचा राजस्थानमध्ये मृत्यू

Rajsthan Salsar Accident News : राजस्थानातील सालासर रोडवर खाटू श्याम बाबांच्या दर्शनाला जात असताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कामठीतील पारसे कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Alisha Khedekar

  • राजस्थानातील सालासर रोडवर भीषण अपघात झाला

  • पारसे कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा जागीच ठार झाले

  • सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

  • खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला

Rajsthan Salsar Road Accident 3 Family Members Dead News राजस्थानातील सालासर रोडवर देवदर्शनाला जाणाऱ्या एका कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. यात आई, वडील आणि मुलगा जागीच ठार झाला आहे. तर इतर सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. राजस्थानातील खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असून भाविकांवर काळानं घाला घातला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव पारसे, कांता पारसे आणि घनश्याम पारसे अशी मृतांची नावे आहेत. पारसे कुटुंब मध्यरात्री बाराच्या सुमारास कामठी येथून उज्जैनला महाकालेश्वर दर्शनाला निघाले. दर्शन घेऊन ते ११ मार्चला राजस्थान रिगंस येथील खाटू श्याम बाबा मंदिराकडे जात असताना जयपुर मार्गावर सालासर परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकपने जबर धडक दिली.

हि धडक इतकी भीषण होती कि, या धडकेत दोन्ही वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. तर पारसे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चालक मनोज चिंदमवारसह आराधना पारसे, पायल पारसे , पल्लवी पारसे, पुनम पारसे, तुषार पारसे आणि पवन बागडे यांचा समावेश आहे.

सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कामठीतील कचरीपुरा परिसरात शोककळा पसरली आहे. तर मृतदेह शवविच्छेदनानंतर कामठी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

Success Story: १.५ गुणांनी संधी हुकली, पण हार मानली नाही; पुढच्याच प्रयत्नात समर्थ राकलेंनी क्लास-१ अधिकारी होऊनच दाखवलं

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT