Satej Patil, Mahadevrao Mahadik, Kolhapur News saam tv
महाराष्ट्र

Rajaram Sahakari Sugar Factory Election Results : करशील काय नाद... हाेशिल बाद ! महादेवराव महाडिक यांचा विजय असाे, काेल्हापूरात जल्लोष सुरु

राजाराम कारखान्याची सत्ता काेणाकडे याचे चित्र दुपारी चारपर्यंत स्पष्ट हाेईल.

संभाजी थोरात

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result News : कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर करण्यात आला आहे. संस्था गटातून सत्ताधारी गटाच्या राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) हे विजयी झाले आहेत. (Breaking Marathi News)

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमाेजणीस (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result) आज (मंगळवार) सकाळी आठ वाजता कसबा बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात प्रारंभ झाला. सत्ताधारी महादेवराव महाडीक यांच्या गटाने पहिल्या फेरीपासून उत्पादक गटात आघाडी मिळवली.

दरम्यान छत्रपती राजाराम कारखान्याचा पहिला निकाल दुपारी अडीचच्या सुमारास हाती आला आहे. या निवडणुकीत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक हे विजयी झाले आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना 129 पैकी 84 मते मिळाली आहेत. त्यांचे विरोधी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांना 44 मते मिळाली आहेत.

छत्रपती राजाराम कारखाना निवडणूक निकाल अपडेट

उत्पादक गट क्रमांक 5

सत्ताधारी महाडिक गट

दिलीप यशवंत उलपे= 3200

नारायण बाळकृष्ण चव्हाण = 3130

विरोधी बंटी पाटील गट

विजयमाला विश्वास नेजदार. =2375

मोहन रामचंद्र सालपे =2302

पाचव्या फेरी अखेर महाडिक गटाचे 13 उमेदवार 800 मतांनी आघाडीवर आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Tuesday : अंगारकी चतुर्थीला ४ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारीचे भविष्य

Herbal Tea : सकाळी उठल्यावर प्या 'ही' हर्बल टी, पोटाच्या समस्यांपासून होईल सुटका

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये एकाच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद

Nashik politics : नाशिकमध्ये ४ मंत्री, पण ध्वजारोहणाचा मान जळगावच्या महाजनांना, पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार?

Shocking: DM सोबतच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये अचानक प्ले झाला पॉर्न VIDEO, पाहताच महिला अधिकारी पळून गेल्या

SCROLL FOR NEXT