राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला
राज ठाकरे INDIA आघाडीत सहभागी होणार असल्याची अधिकृत घोषणा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबरच्या मुंबईतील संयुक्त मोर्चाची घोषणा
आता बातमी राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणांची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार असल्याचा दावा ठाकरेसेनेच्या एका मोठ्या नेत्यानं केलाय. विशेष म्हणजे राहुल गांधींच्या संपर्कात असल्याचा दावा या नेत्यानं केलाय. राज ठाकरेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली? राज ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये नेमकं काय सुरूय? पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत ठाकरे बंधू मोर्चा काढणार आहेत. तेच पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाची चर्चा रंगलीय आणि त्याला कारण ठरलयं. खासदार संजय राऊतांनी केलेला दावा.राहुल गांधी आणि राज ठाकरेंमध्ये संवाद सुरु असल्याचं राऊतांनी सांगितलयं. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाच्या चर्चांवर भाजपनं जोरदार टीका केलीय.
राऊत यांच्या या दाव्यानंतर पत्रकारांनी ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी सूचक विधान करून यात आणखी भर घातली. तर राऊतांनी मात्र त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारी बसलेल्या राज ठाकरे यांनीही यावर मिश्कील हास्य केल्यानं उत्सुकता आणखीनच वाढलीय.
याआधीही उद्धव ठाकरेंनी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना इंडिया आघाडीत सामावून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काँग्रेसनं जोरदार विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरेंचा इंडिया आघाडीतील प्रवेश रखडला होता? काँग्रेसला राज ठाकरेंना नेमका कशामुळे विरोध आहे ते पाहूय़ात.
राज ठाकरेंच्या प्रखर हिंदूत्ववादी भूमिकेमुळे मुस्लीम आणि अल्पसंख्यांक मतदार दुरावण्याची काँग्रेसला भीती
मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे देशातील हिंदी भाषिक मतदार दूर जाण्याची काँग्रेसला चिंता
नवा भिडू आल्यास महाराष्ट्रातील जागावाटपात अडचणी वाढण्याची शक्यता
यासर्व कारणांमुळे राज ठाकरेंचा इंडिया आघाडीतील प्रवेश अद्याप झाला नाही.
राहुल गांधी आणि राज ठाकरेंमध्ये संवाद सुरु असेल तर विरोधकांची मोट बांधून सत्ताधाऱ्यांना हादरे देण्याचा विरोधकांचा प्रयत्न दिसतो. त्यात वैचारिक मतभेद बाजूला ठेवून विरोधक राज ठाकरेंबद्दल सकारात्मक असतील तर इंडिया आघाडीची ही एकी सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.