Raj Thackeray reaction on viral 500 crore audio clip saam tv
महाराष्ट्र

हा तर शहा-काट 'शाहाचं' खेळ!" ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा थेट निशाणा

Raj Thackeray Reaction On Viral 500 Crore Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शहा-काट शहा’ राजकारणाचा टोला लगावत त्यांनी क्लिपच्या सत्यतेसह आरोपांचीही चौकशी करण्याची मागणी केली.

Omkar Sonawane

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी भर पत्रकार परिषदेत 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप ऐकवली. यामध्ये जरांगे यांना श्रीकांत शिंदेंकडून 500 कोटी पोहोचले आहेत, असे धक्कादायक संभाषण आहे. यामुळे महायुतीमध्ये देखील आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सध्या राज्यात एक 'फ्रेंडशिप फाईल' ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ही क्लिप जवळपास 29 मिनिटांची असल्याचे ते म्हणाले. या क्लिपमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी, सोशल मीडियात महत्वाची भूमिका बजावणारे व्यक्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जाणारे काही युट्युब प्रभावक यांच्यातील कथित संभाषण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या संभाषणात 500 कोटींच्या कथित व्यवहाराचा उल्लेख, माध्यमांवर दबाव कसा आणायचा आणि सरकार अडचणीत आल्यास लोकांचे कसे दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा पुढे आणायचा, यासंदर्भात चर्चा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या क्लिपमधील दाव्यांची स्वातंत्रपणे पुष्टी झालेली नसल्याचे त्यांची सत्यता तपासणे महत्वाचे आहे.

ही क्लिप बहुधा दोन वर्षांपूर्वीची असेल, तर ती आताच का समोर आली? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ही क्लिप बाहेर कशी आली आणि ती कोणी समोर आणली, याचाही तपास होण्याची गरज व्यक्त केली आहे. खरंतर यांच्याच सरकारमधलं नेहमीप्रमाणे शहा काट’शाहाचं’ राजकारणच दिसतंय असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

महाराष्ट्राला गोल गोल फिरवू नका

फॉरेन्सिक अहवाल आणि त्यातील तांत्रिक बाबींच्या आधारे जनतेला संभ्रमात ठेवू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. या प्रकरणात केवळ ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून चालणार नाही, तर त्यात करण्यात आलेल्या आरोपांबाबतही स्पष्टता यायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

Uric Acid Symptoms: शरीरात युरिक ॲसिड वाढल्याची सुरुवातीची ७ लक्षणं; याकडे दुर्लक्ष करणं पडेल भारी

PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीआधीच खात्यात ₹२,००० जमा होणार, सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर

ड्रायव्हिंग लायसन्सचा नियम बदलला! पास होण्यासाठी ६० नव्हे तर ७५% गुण पाडावेच लागणार, केंद्र सरकारचा मोठा प्रस्ताव

Water Cut Alert : कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी नळाला थेंबही पाणी येणार नाही; 'या' भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT