MNS supporters celebrate after the party’s surprise victory in Latur Zilla Parishad elections under Raj Thackeray’s leadership. Saam Tv
महाराष्ट्र

राज ठाकरेंचा भाजप-काँग्रेसला दणका; एकही सभा न घेता जिल्हा परिषदेत इंजिन धावलं

Raj Thackeray MNS Victory In Latur Zilla Parishad: एकही सभा न घेता राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने लातूर जिल्हा परिषदेत अनपेक्षित यश मिळवले. भाजप-काँग्रेसला धक्का देत मराठवाड्यात मनसेची जोरदार एंट्री.

Omkar Sonawane

राज्यातील आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागला असून यामध्ये भाजप आणि शिंदे गटाने अनेक ठिकाणी आपला झेंडा फडकवला आहे. मात्र या निवडणुकीत मनसेना कुठलाही प्रचार न करता, एक ही सभा न घेता, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मराठवाड्यामध्ये करिष्मा केला आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये मनसेने अनपेक्षित यश मिळवत 3 जागांवर गुलाल उधळला आहे. या निकालांमुळे मारठवड्यातील राजकारणात राज ठाकरेंनी एंट्री मारली आहे.

लातूर जिल्हा परिषदेत मनसेचे इंजिन सुसाट

रेणापूर तालुका- पानगाव जिल्हा परिषद गट: मनसेचे उमेदवार डॉ. सुनील नागरगोजे विजयी

पंचायत समिती निवडणूक:

पानगाव: मोनिका रवी सूर्यवंशी (मनसे)

कोस्ट गाव: श्रीदेवी गालफाडे (मनसे)

या विजयाने मनसेचे इंजिन लातूरमध्ये सुसाट धावल्याचे दिसून आले आहे.

कॉँग्रेस-भाजपमध्ये जोरदार लढत

लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजपने 36 जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज केली होती. प्रामुख्याने लातूर जिल्हा हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला आहे. यामुळे अमित देशमुख आणि भाजपचे संभाजीराव निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची होती. मात्र मनसेच्या उमेदवारांनी दोघांना ही धक्का देत अनपेक्षित यश मिळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalgona Coffee Recipe: लॉकडाऊनची पुन्हा येणार आठवण, घरीच संध्याकाळी बनवा टेस्टी डाल्गोना कॉफी

High Blood Pressure : आहारात करा या ६ गोष्टींचा समावेश; ब्लड प्रेशरच्या धोका होईल कमी, डॉक्टरांनी सांगितला डाएट प्लान

Maharashtra Live News Update: रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद

Narhari Zirwal: आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांचा राजीनामा कधी घेणार? मुख्यमंत्र्यांनी काय संकेत दिले?

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT