Raj Thackeray presenting files of 4,500 fake voter proofs during the Satyacha Morcha in Mumbai. Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray Exposes 4500 Fake Voters: व्होट चोरीचे 4500 पुरावे, राज ठाकरेंनी मोर्चात आणले पुराव्यांचे गठ्ठे

Raj Thackeray’s Explosive Claim: सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंनी मतदारयाद्यांची चिरफाड केलीय.. मात्र राज ठाकरेंनी दाखवलेले 4500 पुराव्यांमध्ये नेमकं काय आहे?........ याबरोबरच राज ठाकरेंनी दाखवलेल्या पुराव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी काय उत्तर दिलंय?

Bharat Mohalkar

हा ढीग आहे राज ठाकरेंनी सत्याच्या मोर्चात उघड केलेल्या 4 हजार 500 बोगस मतदारांच्या पुराव्याचा.... होय... नवी मुंबईतील बोगस मतदारांचा पर्दाफाश केल्यानंतर आता राज ठाकरेंनी कल्याण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी मतदारसंघातील बोगस मतदारांकडे वळवलाय.. एवढंच नाही तर लोकसभेतील बोगस मतदाराचा फायदा घेतल्याची टीका करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी आव्हानच दिलंय..

दुसरीकडे ज्यांनी मतदारयादीतील सावळा गोंधळ उघड केला, त्यांच्यावरच गुन्हे दाखल केल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय.. सत्याच्या मोर्चात सर्वच विरोधी नेत्यांनी निवडणुकीतील हेराफेरीचा पाढा वाचला....मात्र राज ठाकरेंनी मलबार हिलमधील मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडे चौकशी करण्याची मागणी येथील स्थानिक आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलीय.

खरंतर राहुल गांधींनी व्होटचोरी उघड केली.. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंसह सर्वच विरोधी पक्षांनी पुरावे दाखवून आयोगाची कोंडी केलीय.. त्यामुळे आता निवडणूक आयोग निवडणूका पुढे ढकलणार की सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवून विरोधकांचा विरोध असतानाही निवडणूका घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT