सोलापूर: बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं असं म्हणत राज ठाकरे हे बाळासाहेबांची कॉपी करू शकत नाही असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लगावला आहे. सोलापूरात ते बोलत होते. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेला रामदास आठवले यांचा विरोध आहे. त्यामुळे त्यामुळे राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली आहे. (Raj Thackeray cannot copy to Balasaheb Ramdas Athawale slams to Raj Thackeray)
हे देखील पाहा -
आठवले म्हणाले की, राज ठाकरे हे बाळासाहेबांची कॉपी करू शकत नाही, बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं. बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) भोंगे काढा अशी भूमिका कधी घेतलेली नव्हती, बाळासाहेबांनी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला होता असं आठवले म्हणाले. तसेच फक्त आतंकवादी मुस्लिमांना त्यांचा विरोध होता असंही आठवले म्हणाले. त्याचप्रमाणे बाळासाहेबांची कॉपी करण एवढं सोप्प काम नाहीये असं म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
भविष्यात सरकार पडलं तर शिवसेनेने भाजप बरोबर जुळवून घ्याव असं तुम्हाला वाटतयं का असं विचारलं असता आठवलेंनी त्याच्या खास काव्यमय शैलीत "ज्यावेळेला जुळेल त्यावेळेला तुम्हाला कळेल" असं मिश्किल उत्तर दिलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.