Raj Thackeray and Uddhav Thackeray share a warm moment at Matoshree amid growing alliance speculation. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज ठाकरे तिसऱ्यांदा मातोश्रीवर, युतीच्या मुहूर्तासाठी डिनर डिप्लोमसी?

Raj-Uddhav Dinner Diplomacy: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडतायत...ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालेलं असल्यानं आता राजकीय युतीचा मुहूर्त कधी? असा सवाल वारंवार विचारला जातोय? त्यातच राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? युतीची अधिकृत घोषणा कधी होणार?

Suprim Maskar

ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढताना दिसतेय.. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तिसऱ्यांदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय..विशेष म्हणजे, या भेटीवेळी राज ठाकरेंच्या कुटुंबीयांसह त्यांची आईही सोबत होती. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या भेटीला कौटुंबिक म्हटले जात असले तरी आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालयं...राज ठाकरेंचं कुटुंब तब्बल तीन तास मातोश्रीवर होतं. अवघ्या तीन महिन्यात ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 6 वेळा भेट झालीय...

5 जुलै 2025

हिंदीसक्तीविरोधातील मेळाव्यात दोन्ही बंधू एकाच मंचावर आले..

27 जुलै 2025

राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्री या निवासस्थानी दाखल

27 ऑगस्ट 2025

उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर दाखल

10 सप्टेंबर 2025

उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवास्थानी दाखल

5 ऑक्टोबर 2025

राऊतांच्या नातवाचा नामकरण सोहळा आणि नंतर मातोश्रीवर ठाकरे बंधूंची बंद दाराआड चर्चा

राज ठाकरेंच्या मातोश्रीवरील भेटीनंतर मनसेच्या शिवाजी पार्कातल्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार का याचीही चर्चा रंगू लागलीय. ठाकरे बंधूंमधील वाढत चाललेला हा जिव्हाळा पाहता... दोघांची युती जवळपास निश्चित मानली जातेय. मात्र युती जाहीर करण्याचा मुहुर्त कधी ठरणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT