NDRF संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

गणेशाेत्सवाच्या ताेंडावर पावसाचे थैमान; चिपळूणला पुर स्थिती?

अमोल कलये

चिपळुण : सणाच्या ताेंडावर देखील चिपळुणकरांची पावसाने पाठ काही साेडलेली नाही. साेमवार दुपारपासून सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत पडत हाेता. त्यामुळे शहारातील बहुतांश सखल भागात आज पाणी साचले आहे. वशिष्ठी आणि शिवनदी किनारी भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. हवामान खात्याने नऊ सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सवाची लगबग सुरु असताना काळजीचे वातावरण पसरले आहे. rain-update-ratnagiri-chiplun-khed-dapoli-ganesh-festival-2021-sml80

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील म्हणाले नागरिकांनी धोक्याच्या क्षेत्रात जाऊन नये. ज्या भागात पूराचे पाणी येऊ शकते अशा भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावे. भूस्खलन प्रवण क्षेत्रांजवळ नागरिकांनी प्रवास करू नये असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

दाेपाली भागात पावसाचा जाेर कमी झालेला आहे. त्यामुळे नागरिक गणेशाेत्सवाच्या खरेदीसाठी घरा बाहेर पडले आहेत. दरम्यान स्थानिक प्रशासनाने या भागात बाेटींची व्यवस्था केली आहे. याबराेबरच शिवनदी, जगबुडी नदी, वशिष्ठी नदी या भागातील नागरिकांना आवश्यकता भासल्यास सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT