rajapur rain update
rajapur rain update 
महाराष्ट्र

राजापूरात पावसाचा जाेर सुरुच; छत्रपती शिवाजी चौकात शिरले पाणी

अमोल कलये

रत्नागिरी : गेल्या तीन चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. विशेषतः राजापूर शहरात पडणा-या पावसामुळे rajapur rain update येथील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. येथे रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आला आहे. (rain-update-rajapur-kodavali-arjuna-river-flooded-ratnagiri-marathi-news)

राजापूरच्या बाजारपेठेत पाणी शिरले आहे. याबराेबरच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या पाणी शिरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजापूरला पुराचा वेढा निर्माण झाला आहे. दुसऱ्यांदा राजापूरला पुराचा फटका बसला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यास रविवारपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या दाेन दिवसांत या भागात पाऊस सुरुच आहे. राजापूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पूरपरिस्थिती साेमवारी निर्माण झाली हाेती. आज (बुधवार) नदीचे पाणी शहरातील बाजारपेठेत सकाळपासून भरण्यास सुरुवात झाली हाेती. शहरातील चौकात पाणी भरू लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

येत्या तीन दिवसांसाठी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्टचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे या भागात माेठ्या प्रमाणात पाउस पडू शकताे अशी शक्यता आहे. सध्या येथे पावसाची संततधार सुरु राहिल्याने नद्यांची पाणी पातळी वाढू शकते. यामुळे या भागात पुराचा धोका आणखी वाढू शकतो.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

SCROLL FOR NEXT