Rain Update : उत्तर भारतात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेश, दिल्लीमध्ये अनेक भागात पूरसदृश परिस्थिती आहे. हिमाचलमध्ये तर अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतली आहे.
पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. पुढील 3-4 दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात पाऊस कसा असेल यावर एक नजर टाकूया.
महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस पाऊस संमिश्र राहील. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 13 जुलै नंतर पावसात सुधारणा होईल असा अंदाज हवामान विभागने दिला आहे. (Latest Marathi News)
11 जुलै म्हणजे उद्या कोकणातील सिंधुदुर्गात आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 12 जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आणि विदर्भात देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
13 जुले रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. 13 जुलै रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, लातूर, जालना, धाराशीव जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.