NAGPUR RAILWAY ACCIDENT: TWO BROTHERS KILLED AFTER GOODS TRAIN HIT IN SAONER, POLICE INVESTIGATION UNDERWAY Saam Tv
महाराष्ट्र

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

Railway Accident Update News : नागपूरच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात रेल्वे रुळांवर मालगाडीच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे.

Alisha Khedekar

  • नागपूरच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात मालगाडीच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

  • दोघेही शेतात जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत असताना हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती

  • पोलिसांचा पुढील तपास सुरु

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात रेल्वे मार्गावर दोघांचा मृतदेह आढळला. मालगाडीच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की मृतांच्या शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत सापडले असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन भाऊ नेहमीप्रमाणे शेतात शेताच्या कामासाठी जात होते. रेल्वे मार्गाच्या पलीकडे शेत असल्याने रेल्वे रूळ ओलांडून ते शेतात जात होते. याचदरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या मालगाडीखाली येऊन ते चिरडले गेले. ही घटना एवढी भीषण होती की, दोन्ही भावांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. तर शीर धडापासून वेगळं झालं.

या धक्कादायक घटनेच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने सावनेर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत दोघेही शेताच्या दिशेने गेले होते.

मात्र रेल्वे रुळांवर ते कशा परिस्थितीत आले, हा अपघात होता की इतर कोणते कारण होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावरील सर्व अवयव गोळा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT