Ahmednagar railway Accident  Saam tv
महाराष्ट्र

Freight train derailed : अहमदनगरमध्ये भीषण रेल्वे अपघात, मालगाडीचे डबे रुळावरून घसरले

Freight train derailed in ahmednagar : अहमदनगरमध्ये भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. दौंडकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे घसरल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे, साम टीव्ही प्रतिनिधी

अहमदनगर : अहमदनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. रविवारी रात्री ही अपघाताची घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यात मनमाडकडून दौंडकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे घसरल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीविहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

अमदनगरमधील मनमाड-दौंड रेल्वे मार्गावर मनमाडकडून दौंडकडे जाणाऱ्या मालगाडीच्या डब्याचे चाक निसटल्यानंतर डबे घसरल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील कोन्हेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत ही अपघाताची घटना घडली आहे. ही मालगाडी रिकामी होती, त्यामुळे या अपघातात सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.

रेल्वेचे डबे घसरल्यानंतर रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करण्याच्या उपायोजना युद्ध पातळीवर सुरू केल्या. मालगाडीचे डबे नेमके कशामुळे घसरले, या संदर्भात आढावा घेण्यात येत आहे.

कान्हेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत झालेल्या या अपघातामुळे रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. रुळावरून घसरलेला डबा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT