सचिन कदम, साम टीव्ही
रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक तथा जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील वित्त लेखा सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) रायगड पथकाने बुधवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची माहिती आहे. तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप भस्मे यांच्यावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या बदलीच्या कामासाठी योगेश भस्मे यांनी तक्रारदाराकडे कथितरित्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पथकाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ठरलेल्या ठिकाणी लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने भस्मे यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईत दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
योगेश भस्मे हे रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात वित्त लेखा सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी असल्याने या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. बदलीसारख्या प्रशासकीय कामासाठी आर्थिक व्यवहाराचा आरोप झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, बदलीच्या प्रक्रियेत भस्मे यांची नेमकी भूमिका काय होती, बदलीच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा त्यांना अधिकार होता का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास एसीबीकडून केला जाणार आहे. प्रकरणातील पुढील तपशील अधिकृत कारवाईनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.