Vaccination Updates Saam TV
महाराष्ट्र

Raigad: 12-14 वयोगटातील मुलांचे उद्यापासून लसीकरण; प्रशासन सज्ज

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ते वाढताना दिसून आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी पुढील काळात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccine) मोहिमेत १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना व ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना ‘प्रिकॉशन’ डोस देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा परिषद आरोग्य (ZP Health Department) विभाग सज्ज होत असून, ग्रामीण भागात शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या समन्वयाने जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटातील १ लाख ४० हजार ५०० मुलांची लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ते वाढताना दिसून आले आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचे म्युटेशन लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु ही लाट सौम्य ठरली. यात मुलांची संख्या एक टक्क्यांहून कमी होती असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भविष्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण व ६० वर्षांवरील ज्येष्ठांना प्रिकॉशन म्हणजे बूस्टर डोस महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे १२ ते १४ वयोगटातील मुलांसह १४ वर्षांवरील ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला नाही किंवा पहिल्या व दुसऱ्या डोसमधील निर्धारित कालावधी उलटूनही ज्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत २२ लाख ६६ हजार जणांचे लसीकरण

जिल्ह्यात आत्तापर्यंत ४२ लाख ८५ हजार ३५९ कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ३६ हजार १६३ जणांनी प्रिकाॅशन डोस घेतले आहेत. तर १९ लाख ८४ हजार ३० जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांच्यासाठी ३९ लाख ६८ हजार ६० डोस वापरण्यात आले. तर २ लाख ८१ हजार १३६ जणांनी लसीचा केवळ एक डोस घेतला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

SCROLL FOR NEXT