shivsena and bjp  saam tv
महाराष्ट्र

Political News News : ...तर तुमचा हिशोब करायला आम्ही कमी पडणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा भाजप-राष्ट्रवादीला इशारा

Latest News : रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका मांडत रायगड लोकसभेच्या जागेवर हक्क सांगितला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad News :

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सर्वच पक्ष आपली ताकद आजमावत आहेत. राज्यात शिंदे-भाजप सरकार असलं तरी अनेक भागात दोन्ही पक्ष आजही एकमेकांसमोर उभे आहेत. रायगडमध्येही तशीच काहीशी स्थिती आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपविरोधात एल्गार पुकारला आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका मांडत रायगड लोकसभेच्या जागेवर हक्क सांगितला आहे. रायगड लोकसभेची जागा मिळाली नाही तर सर्व पदाधिकारी राजीनामा देतील, असा इशारा अलिबागमध्ये ग्रामपंचायत निवडणूक विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभात दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजपच्या असहकार भूमिकेनंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीतच पदाधिकाऱ्यांनी एल्गार पुकारला असून या भूमिकेला आमदार दळवी यांनी पाठिंबा दिल्याने याचे गांभीर्य वाढले आहे.

मित्र पक्षात सुधारणा झाली नाही तर तुमचा हिशोब करायला आम्ही कमी पडणार नाही, असा इशाराच आमदार दळवी यांनी भाजपसह राष्ट्रवादीलाही दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : वीकेंडला करा जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान, पालघरमध्ये आहे सुंदर डेस्टिनेशन

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

SCROLL FOR NEXT