Vidhan Sabha Election Result Saam tv
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Raigad News : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीची सत्ता राज्यात बसणार हे निश्चित झाले आहे.

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रायगड
: विधानसभा निवडणुकीत अपेक्षित असलेल्या निकालापेक्षा वेगळा निकाल पाहण्यास मिळत आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात देखील अनपेक्षित निकाल लागला असून जिल्ह्यातील सातही जागांवर विजय मिळवुन महायुती सरशी झाली आहे. अर्थात महाविकास आघाडीला खाते देखील उघडता आलेले नाही. 

विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election) निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीची (Mahayuti) सत्ता राज्यात बसणार हे निश्चित झाले आहे. बहुतांश मतदारसंघात महाविकास आघाडीला एका देखील जागेवर खाते उघडता आलेले नाही. हीच परिस्थिती रायगड जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. रायगडमध्ये महाविकास आघाडीची एकही जागा हाती न आल्याने महाविकास आघाडीची रायगड जिल्ह्यात पार पिछाडी झाल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात निवडणूक निकाला दरम्यान पाहायला मिळाले.  

कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेद्क्ष थोरवे आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत विजयासाठी चढउतार पाहायला मिळला. तर महाडमध्ये श्रीवर्धन अलिबाग पेण या ठिकाणी निम्या फेऱ्या होत असतानाच विजय निश्चित झाल्याचे चित्र रायगडमध्ये पाहायला मिळाले. यामुळे रायगड मधील मतदारांनी महायुतीला एकतर्फी कौलं दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT