raigad News loud noise from the ground at kasbeshivathar village in mahad taluka Saam TV
महाराष्ट्र

Raigad News: महाडच्या कसबे शिवथर गावात जमिनीतून मोठा आवाज; नागरिक भयभीत

Raigad Mahad Latest News: रायगडमधून एक मोठी बातमी समोर येतेय. रायगडच्या महाड तालुक्यातील कसबे शिवथर गावच्या परिसरात मागील काही दिवसांपासून भूगर्भातून मोठमोठे आवाज येत आहेत.

Satish Daud

सचिन कदम, साम टिव्ही

Raigad Mahad Latest News: रायगडमधून एक मोठी बातमी समोर येतेय. रायगडच्या महाड तालुक्यातील कसबे शिवथर गावच्या परिसरात मागील काही दिवसांपासून भूगर्भातून मोठमोठे आवाज येत आहेत. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. शनिवारी (दि.५) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास देखील जमिनीमध्ये मोठा हादरा झाल्याचा आवाज झाला.

यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने प्रशासनाला दिली. ही घटना कळताच महाड पोलीस अपत्ती विभाग घटनास्थळी रात्री पोहचले आणि घटनेचा आढावा घेतला. दरम्यान, आज (दि.६) सकाळी या घटनेची दखल घेत महाडचे प्रांताधिकारी, तहसीलदार, एनडीआरफ टीम घटनास्थळी पोहचली आहे.

यावेळी नागरिकांनी प्रशासनाकडे हा नेमका काय प्रकार आहे, याची विचारणा करून शोध घेण्याची मागणी केली. महाड तालुक्यात गेल्या दीड महिन्यात तुफानी पाऊस झाला आहे. काही दिवसापूर्वी पारमाची गावातील घरांना तडे गेल्याचे व जमिनीत उंचवटे निर्माण झाल्याचे प्रकार समोर आल्यानंतर येथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले होते.

या दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून कुंभे शिवथर, कसबे शिवथर आणि चेराववाडी परिसरात जमिनीतून स्फोटासारखे आवाज येत असल्याने जनतेत घबराट निर्माण झाली आहे. दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या कसबे शिवथर गावात ७० ते ८० घरं आहेत.

दरम्यान, महाडचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बाणापुरे यांनी महसूल कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच एनडीआरएफच्या टीमसह गावाला भेट दिली आणि दिवसभर पाहणी केली. मात्र, त्यांना काही यामागची कारणे समजू शकली नाहीत. या टीम ने ग्रामस्थांना धीर देत सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात ग्लोइंग लुक पाहिजे? मग वापरा या सोप्या मेकअप ट्रिक्स

LPG Cylinder Booking: एलपीजी गॅस बुकिंग कसा करायचा? HP, Indane आणि भारत गॅसची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Dry Fruits Storage Tips : ड्रायफ्रुट्स जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी जाणून घ्या या स्मार्ट स्टोरेज टिप्स

Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT