Raigad News Saam tv
महाराष्ट्र

Raigad News : आयडी कार्ड दाखवून केला घरात प्रवेश; घर मालकाच्या सतर्कतेने तोतया इन्कमटॅक्स अधिकारी ताब्यात

Raigad News :

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रायगड
: अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार रायगड जिल्ह्यातील रोहा येथे समोर आला आहे. आयडी कार्ड दाखवून घरात प्रवेश केला. यानंतर तपासणी देखील केली. मात्र या तोतया इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

रायगड (Raigad) जिह्यातील रोहा शहरातील हि घटना असून नागरीकांच्या सतर्कतेमुळे हे तोतया इन्कमटॅक्स अधिकारी गजाआड केले आहेत. आपण इन्कम टॅक्स अधिकारी आहोत; अशी बतावणी करत पाच जण रोहा शहरात फिरत होते. या दरम्यान हे पाचही जण शहरातील आसिफ अन्सारी यांच्या घरात शिरले. आयडी दाखवून त्यांनी घरात प्रवेश केला. मात्र अनावश्यक चौकशी आणि संशयास्पद आयडी कार्ड यामुळे अन्सारी यांना संशय आला. त्यानंतर अन्सारी यांनी पोलिसांना फोन लावत सर्व प्रकार सांगितला. 

घडलेल्या प्रकाराबाबत (Police) पोलिसांना माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. दरम्यान तीन जणांना पकडण्यात यश आले. तर दोन जण फरार झाले. फरार झालेल्या दोघांचा शोध सुरु असून पकडलेल्या तीन जणांचे आयकार्ड, मोबाईल फोन रोहा पोलिसांनी ताब्यात घेतले असून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT