Raigad Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Accident: पेणजवळ कंटेनरला भीषण अपघात, चालक गंभीर जखमी

Latest News: कंटेनरमधील पोती रस्त्यावर पडल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.

Priya More

Raigad News : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) कंटेनरला भीषण अपघात (Container Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर कंटेनर महामार्गावर पलटी झाला. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. कंटेनरमधील पोती रस्त्यावर पडल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळील रामवाडी येथे कंटेनर पलटी झाला. या अपघातामध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा कंटेनर मुंबईवरुन कोकणाच्या दिशेन जात होता. त्याचवेळी अचानक चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर पलटी झाला. या अपघातामध्ये कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गावर कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर ही घटना घडली. कंटेनर महामार्गावर पलटी झाल्यानंतर त्यामध्ये असलेली पोती रस्त्यावर पडली. अपघाताची माहिती मिळताच रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी झालेल्या कंटेनर चालकाना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त कंटेनर महामार्गावरुन हटवण्याचे काम सुरु आहे. या अपघातामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा घसरले; १० तोळ्यामागे २९,४०० रुपयांची घसरण, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री ४१ व्या वर्षी होणार आई, थाटात पार पडले डोहाळे जेवण | PHOTOS

Maharashtra Live News Update : धाराशिवात शेतकरी दुहेरी संकटात

भोंदू खरातचे काळे कारनामे संपेना! राजकीय नेत्यांना लावला लाखोंचा चुना; १ किलो मधाची बाटली ९ लाखांना विकायचा

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात केले बदल; तुमच्यावर काय होणार परिणाम? वाचा

SCROLL FOR NEXT