Raigad Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Accident: डिझेल संपल्याने झाला घात, मुंबई-गोवा महामार्गावर कारला टोईंग व्हॅनची धडक; चौघांचा जागीच मृत्यू

Fatal Accident On Mumbai Goa highway: मुंबई- गोवा महामार्गावर कारला टोईंग व्हॅनने धडक दिली. वीर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला.

Priya More

सचिन कदम, रायगड

मुंबई-गोवा महामार्गावर कारला टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रायगडच्या वीर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामधील मृत आणि जखमी हे सर्वजण महाड येथे राहणारे आहेत. रात्री उशिरा अपघाताची ही घटना घडली आहे. या अपघाताचा तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झालाय. डिझल संपल्याने बंद पडलेली स्कॉपिओ कार महामार्गाच्या लगत थांबली होती. याच वेळी पाठीमागून आलेल्या टोईंग व्हॅनने या कारला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सूर्यकांत मोरे, साहिल शेलार (२५ वर्षे), समिप मिंडे आणि प्रसाद नातेकर (२५ वर्षे) असं जागीच मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. हे सर्व महाडच्या कुंभार आळीमध्ये राहणारे होते. तर सूरज नलावडे (३४ वर्षे, रहाणार- चांभार खिंड) आणि शुभम माटल (२६ वर्षे - राहणार शिरगाव) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई -गोवा महामार्गावरून हे सर्वजण प्रवास करत असताना हा अपघात झाला.

महाडवरून मुंबईला जात असताना वीर रेल्वे स्थानकाजवळ स्कॉपिओ कारचे डिझल संपल्याने कार बाजूला थांबवण्यात आली होती. कारमधून प्रवास करणारे हे ६ जण कारशेजारी उभे होते. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टोईंग व्हॅनने बंद स्कॉपिओला जोरदार धडक दिली.

टोईंग व्हॅनच्या धडकेन स्कॉपिओ कार सुमारे ५० मीटर लांब उडवली गेली आणि सर्व्हीस रोडच्या पलिकडील खड्डयात पडली. अपघातादरम्यान टोईंग व्हॅनने कारजवळ उभे असलेल्यांना जोरदार धडक बसल्याने यामधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT